

Vehicle Insurance Rules 2026 What Has Changed in Motor Insurance Policy Renewal Premium Third Party Cover and Claim Process
esakal
खासगी मोटारी व दुचाकींच्या विम्याच्या क्षेत्रात १५ डिसेंबर २०२६ पासून महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. सर्व नवीन आणि नूतनीकरण केल्या जाणाऱ्या खासगी मोटारी व दुचाकींच्या विमा पॉलिसींसाठी नवी चार-स्तरीय रचना अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत ग्राहकांना केवळ ‘थर्ड-पार्टी’ किंवा ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह’ या दोन पर्यायांमधून निवड करावी लागत होती; परंतु, आता त्यांना चार भागांमध्ये विभागलेली एकच पॉलिसी मिळेल आणि प्रत्येक भागानुसार नेमके कोणते संरक्षण (कव्हर) हवे आहे, हे एका फॉर्मवर निवडणे आवश्यक असेल.