
GST Council Meeting
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी आपल्या देशवासियांना दिवाळी भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दर कपातीची घोषणा केली. दर कपातीमुळे सणासुदीच्या काळात अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील. हे दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याने त्याचा परिणाम त्यानंतरच दिसून येईल.