
ऋत्विक जाधव - टेक्निकल ॲनालिस्ट
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) सुरू केलेला ‘निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स’ हा एक थीमॅटिक ऋत्विक जाधवइंडेक्स (निर्देशांक) आहे, जो देशातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेतो. हा निर्देशांक पर्यटन क्षेत्रातील वाढीचे थेट लाभार्थी असलेल्या कंपन्यांच्या कामगिरीसाठी तयार केलेला आहे. या निर्देशांकामध्ये हॉस्पिटॅलिटी व हॉटेल्स, ट्रॅव्हल सर्व्हिसेस व अॅग्रीगेटर, एव्हिएशन व ट्रान्स्पोर्ट, पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.