फिनटेक : ‘एनव्हिडिया’ची नवी उडी

एआय व ग्राफिक्ससाठी ‘आरटीएक्स स्पार्क’ सुपरचिप; सीपीयू-जीपीयू एकत्र आणत एनव्हिडिया लॅपटॉप बाजारात, इंटेल-एएमडी-क्वालकॉमला थेट आव्हान
Strategic Pivot: Nvidia’s Entry into Laptop Processors

Strategic Pivot: Nvidia’s Entry into Laptop Processors

Sakal

Updated on

अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक-विश्‍लेषक

अलीकडेच आलेल्या ताज्या बातमीनुसार ‘एआय’ आणि ग्राफिक्स क्षेत्रात आघाडीवर असणारी एनव्हिडिया कंपनी आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी लॅपटॉप बाजारपेठेमध्ये उतरणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांनी तैवानमधील ‘कॉम्प्युटिक्स’ तंत्रज्ञान प्रदर्शनात एका नव्या ‘सुपरचिप’ची घोषणा केली आहे. या चिपचे नाव ‘आरटीएक्स स्पार्क’ असे असेल. आतापर्यंत एनव्हिडिया प्रामुख्याने एआय सर्व्हर आणि व्हिडीओ गेमसाठी लागणारे महागडे ग्राफिक कार्ड (जीपीयू) बनविण्यासाठी ओळखली जायची. संगणकाचे कामकाज चालवत असलेले सीपीयू इंटेल, एएमडी अशा कंपन्या तयार करतात. आता या बाजारपेठेत आपले स्थान भक्कम करण्यासाठी एनव्हिडिया कंपनीने कॉम्प्युटरच्या मुख्य मेंदूमध्ये, म्हणजेच प्रोसेसर क्षेत्रात प्रवेश केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com