PIA selling
Sakal
Pakistan International Airlines Selling : पाकिस्तानमध्ये नेहमीच काहीनाकाही आर्थिक संकट येत असतात. यातच आता सरकारने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) ही सरकारी विमान कंपनी पूर्णपणे विकण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपनीत होणार सततचा तोटा, प्रचंड कर्ज, राजकीय हस्तक्षेप आणि IMF चा दबाव यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. 23 डिसेंबर रोजी इस्लामाबादमध्ये या कंपनीचीचा लिलाव होणार असून, यात मोठे उद्योगसमूह सहभागी होणार आहेत.