Pan-Aadhar Linking till 31 December 2025
Sakal
PAN-Aadhaar linking : सध्याच्या काळात कोणताही मोठा व्यवहार करायचा म्हटलं की पॅन कार्डची गरज भासते.आता आयकर विभागाने पॅन कार्ड सूर ठेवण्यासाठी ते आधार लिंक करायला लावले आहे आणि त्यासाठी मुदतही दिली आहे. आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे आता आधार-पॅन लिंक करण्यासाठी १० दिवसांपेक्षाही कमी वेळ उरला आहे. ज्यांनी अद्याप आधार-पॅन लिंक केलेले नाही, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. १ जानेवारी २०२६ पासून ज्यांचे पॅन-आधार लिंक नाही, त्यांचा पॅन निष्क्रिय ठरेल.