
98.31% नोटा बँकिंग सिस्टीममध्ये परतल्या – 2000 रुपयांच्या नोटा जवळपास बंद झाल्या असून फक्त ₹6,017 कोटींच्या नोटा मार्केटमध्ये आहेत.
बँकांमधून बदलता येणार नाहीत – आता फक्त RBI च्या 19 इश्यू ऑफिसेस किंवा पोस्टाच्या माध्यमातूनच नोटा बदलता येणार.
क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत नोटा बाद करण्यात आल्या – RBI ने वापर कमी आणि गरज नसलेल्या 2000 च्या नोटा चलनातून हळूहळू बाद करण्याचा निर्णय घेतला.
2000 Rs Note Exchange: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून हळूहळू मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी या नोटांचा एकूण साठा 3.56 लाख कोटी रुपये इतका होता. आता जवळपास सव्वा वर्षानंतर मनीकंट्रोलच्या अहवालानुसार फक्त 6,017 कोटी रुपये किमतीच्या नोटा चलनात आहेत.