
Top 25 Global Banks: भारतातील HDFC बँक, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी जगातील सर्वाधिक मार्केट कॅप असलेल्या टॉप 25 बँकांमध्ये स्थान मिळवले आहे. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. डेटा ॲनालिटिक्स आणि रिसर्च कंपनी ग्लोबल डेटाच्या अहवालात म्हटले आहे की, जगातील टॉप 25 मार्केट कॅप बँकांमध्ये HDFC बँक 13व्या, ICICI बँक 19व्या आणि SBI 24व्या क्रमांकावर आहे.