.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सरकारला ३६६२.१७ कोटी रुपयांचा लाभांश प्रदान केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नुकताच एलआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांनी लाभांशाचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी वित्तीय सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव एम. पी. तंगिराला यांच्यासह एलआयसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.