
थोडक्यात:
इंडियन बँक, SBI, कॅनरा बँक आणि PNB यांनी सेव्हिंग खात्यांवरील मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द केली आहे.
ग्राहकांनी खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास त्यांच्याकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही.
या निर्णयामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ, ग्राहकाभिमुख आणि पारदर्शक होणार आहेत.
Minimum Balance Rule: बचत खात्यात ठरावीक किमान शिल्लक (Average Monthly Balance - AMB) ठेवणं बऱ्याच बँकांसाठी आवश्यक असतं. जर खात्यात हा किमान बॅलन्स नसेल, तर बँका दंड आकारतात. मात्र, आता देशातील चार मोठ्या बँकांनी हा नियम हटवून खातेदारांना दिलासा दिला आहे. म्हणजेच, आता खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास कुठलाही दंड द्यावा लागणार नाही.