

₹18 Lakh Arrears for Government Employees? Check the Calculation Behind the Estimate
eSakal
8th Pay Commission Salary Hike Arrear: देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींकडे लागले आहे. नव्या वेतनाची अंमलबजावणी जर 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी मानली गेली आणि प्रत्यक्ष वेतनवाढ नंतर मिळाली, तर त्या कालावधीतील फरकाची थकबाकी म्हणजेच मोठा एरियर कर्मचाऱ्यांना मिळू शकतो.
8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास 20 ते 24 महिन्यांचा विलंब झाला, तर वाढीव बेसिक पगाराच्या आधारे कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम एरियर म्हणून मिळू शकते. मात्र, ही रक्कम अंतिम नसून फिटमेंट फॅक्टर आणि सरकारच्या अंतिम निर्णयावर ती अवलंबून असेल.