

8th Pay Commission update
esakal
8th Pay Commission Update: केंद्र सरकारचे कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेषतः पगार आणि पेन्शनमध्ये होणारी सुधारणा एक जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल की नाही. थकबाकी मिळेल का? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. सातव्या वेतन आयोगाचा दहा वर्षांचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, संसदेतील अलीकडील चर्चेदरम्यान सरकारने या प्रभावी तारखेबाबत स्पष्ट मत व्यक्त केलेले नाही, असे एका माध्यमातील अहवालात नमूद करण्यात आले आहे.