

Central government clarifies in Rajya Sabha that no new proposal exists to extend spouse posting benefits to employees of autonomous institutions
esakal
Central Autonomous Employees: आठव्या वेतन आयोगाबाबत देशभरातली सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर, राज्यसभेत सरकारने दिलेल्या एका उत्तरामुळे केंद्रीय स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारने हे स्पष्ट केले आहे की, सद्यस्थितीत तरी, अशा संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या पती-पत्नींना एकाच ठिकाणी नियुक्ती देण्याबाबत कोणतीही नवीन योजना किंवा प्रस्ताव विचाराधीन नाही.