8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Central Government Employees : सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेत साधारणपणे १० वर्षांच्या अंतराने मोठ्या सुधारणा केल्या जातात. ७वा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला असून ८व्या वेतन आयोगाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
8th Pay Commission and Central Government Employees

8th Pay Commission and Central Government Employees

esakal

Updated on

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या जवळपास एका दशकापासून '८ व्या वेतन आयोगा'ची प्रतीक्षा केली जात आहे. आता या आयोगाची स्थापना झाली असून विविध शहरांमध्ये कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांशी चर्चा सुरू आहे. अशातच एक महत्त्वाची मागणी समोर आली आहे: सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतन (पेन्शन) पुनरावलोकनाचे चक्र १० वर्षांवरून ५ वर्षांवर आणले जावे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील वेतन आणि निवृत्तीवेतन सुधारणेसाठी पुन्हा एक दशक वाट पाहावी लागणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com