8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगार किती वाढणार? 8व्या वेतन आयोगाच्या पहिल्या बैठकीत मोठा संकेत

8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग आपला अहवाल तयार करण्यासाठी वेगाने काम करत आहे. त्यासाठी विविध स्तरांवर बैठका सुरू झाल्या असून कर्मचारी संघटनांकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा केली जात आहे.
8th Pay Commission

Big Update on 8th Pay Commission! First Meeting Gives Massive Salary Hike Signals

eSakal

Updated on

8th Pay Commission Update: देशातील 45 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचारी संघटना आणि संस्थांच्या मागण्या व प्रस्तावांवर सखोल चर्चा करण्यासाठी आयोगाने आता विविध राज्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. यावेळी आयोगाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये आयोगाच्या पहिल्या बैठकीत NC-JCM (नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी) स्टाफ साइडचे सचिव शिव गोपाल मिश्रा आणि आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई उपस्थित होत्या असे सांगितले. माध्यमांच्या वृत्तानुसार, मे महिन्यात, आयोग पुणे आणि महाराष्ट्रातील इतर संघटनांना भेटणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com