
8th Pay Commission Fitment Factor Marathi News : केंद्र सरकारनं आता ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. तसंच लवकरच ८वा वेतन आयोग स्थापन करण्यात येईल त्यानंतर या आयोगानं दिलेल्या शिफारशी स्विकारुन त्या १ जानेवारी २०२६ पासून अंमलात येतील म्हणजेच पुढील वर्षात हा वेतन आयोग लागू करण्याचा मानसही सरकारनं व्यक्त केला आहे. त्यामुळं केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनरधारकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. पण या ८ व्या वेतन आयोगात मागील सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत कुठले मोठे बदल होणार आहेत, हे जाणून घेऊयात.