8th Pay Commission : आठवा वेतन आयोग २०२८ पर्यंत लांबणीवर पडल्यास सरकारवर ३ लाख कोटींचा अतिरिक्त बोजा

India Fiscal Deficit : आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या खर्चात किमान ₹३ लाख कोटी वाढ करू शकते. वेतन वाढीमुळे कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनधारकांची खरेदी क्षमता वाढल्याने देशांतर्गत उपभोग व मागणीला चालना मिळू शकते.
8th Pay Commission : आठवा वेतन आयोग २०२८ पर्यंत लांबणीवर पडल्यास सरकारवर ३ लाख कोटींचा अतिरिक्त बोजा
Updated on: 

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) अंमलबजावणी २०२८ पर्यंत लांबणीवर पडल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. ड्यूश बँक रिसर्चच्या (Deutsche Bank Research) ताज्या अहवालानुसार, वेतन आणि पेन्शनची थकबाकी जमा होत गेल्याने सरकारला किमान ३ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे सरकारच्या आर्थिक नियोजनासमोर नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...