

Will Minimum Salary Rise to ₹69,000? 3.833 Fitment Factor Demand and 5 Major Updates
eSakal
8th Pay Commission Latest News: आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अजूनही पगार आणि पेन्शनमधील वाढीची प्रतीक्षा आहे. फिटमेंट फॅक्टर किती असेल, किमान बेसिक पगार किती वाढेल आणि पेन्शनमध्ये किती वाढ मिळेल, असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडले आहेत.
सरकारकडून अद्याप या मुद्द्यांवर अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र, आयोगाने गेल्या वर्षभरात आपल्या कामाला वेग दिला असून, कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना व मागण्या मागवण्यासह विविध बैठका घेतल्या आहेत. जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगाशी संबंधित आतापर्यंतचे 5 महत्त्वाचे अपडेट्स.