
पती-पत्नी एकत्रित पद्धतीने दरमहा 53,000 रुपये गुंतवणूक केल्यास केवळ 10 वर्षांत तब्बल 1.24 कोटींचा फंड तयार होऊ शकतो.
या प्लॅनमध्ये डेट, हायब्रिड, इक्विटी म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचं योग्य वाटप आहे.
शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक हेच या योजनेचं खरं वैशिष्ट्य आहे.
Smart Couple Investment Plan: आजच्या काळात महागाई गगनाला भिडत असताना फक्त कमाई पुरेशी नाही, तर बचत आणि गुंतवणूक दोन्हींचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जर पती-पत्नीने ठरावीक शिस्त पाळून नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली, तर केवळ 10 वर्षांत तब्बल 1.24 कोटी रुपयांचा फंड उभा करता येऊ शकतो. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, सर्टिफाइड वेल्थ मॅनेजर विजय माहेश्वरी यांनी यासाठीचा प्लॅन सांगितला आहे.