पॅन कार्ड करा ‘अॅक्टिव्हेट’!

या मुदतीच्या आत जी पॅन कार्ड आधार कार्डशी जोडली (लिंक) जाणार नाहीत,
how to apply for pan card online
how to apply for pan card onlineesakal

गेली दोन-तीन वर्षे आपले पॅन कार्ड हे आधार कार्डशी जोडून अॅक्टिव ठेवा, असे वारंवार सांगितले जात होते. आतापर्यंत बऱ्याच वेळा यासाठी दिलेली अंतिम मुदत वाढवून दिली गेली होती. यासाठी ३० जून २०२३ ही अंतिम तारीख दिली होती व यात कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले होते.

या मुदतीच्या आत जी पॅन कार्ड आधार कार्डशी जोडली (लिंक) जाणार नाहीत, अशी पॅन कार्ड ‘इनअॅक्टिव्ह’ होतील, याची जाणीव वेळोवेळी दिली गेली होती. असे असूनसुद्धा ३० जून २०२३ च्या आत मोठ्या संख्येने पॅन कार्ड आधार कार्डशी जोडली गेलेली नाहीत.

how to apply for pan card online
Mumbai : एमएमआरडीएच्या माध्यमातून भुयारी बोगदा बांधण्यात येणार; ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह हे अंतर काही मिनिटांत पार!

प्राप्तिकर विभागाने जाहीर केल्यानुसार, ११,२७,४१,१५५ एवढी पॅन कार्ड एक जुलै २०२३ रोजी ‘इनअॅक्टिव्ह’ झाली असल्याचे दिसून येते. यातील बहुतांश पॅन कार्ड ही मृत व्यक्ती, डुप्लिकेट पॅन कार्ड; तसेच ज्यांचे उत्पन्न करपात्र नाही किंवा अनिवासी भारतीय यांची असल्याचे दिसून येते. असे असले तरी अजूनही ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे किंवा ज्यांना पॅन कार्ड आवश्यक असणारे व्यवहार करायचे आहेत.

(उदा. शेअर वा म्युच्युअल फंड यातील गुंतवणूक/घर/वाहन/सोने यासारखी खरेदी) अशांच्या पॅन कार्डचा यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आपले पॅन कार्ड ‘इनअॅक्टिव्ह’ झाले असेल, तर आपल्याला शेअर/म्युच्युअल फंड/बँक एफडी/सोने/घर, जमीन यांत गुंतवणूक करता येणार नाही. आपला ‘टीडीएस’; तसेच ‘टीसीएस’ वाढीव दराने कापला जाईल व त्याचा रिफंड मागता करता येणार नाही; कारण आपण आपले इन्कम रिटर्नसुद्धा भरू शकणार नाही.

how to apply for pan card online
Mumbai : एमएमआरडीएच्या माध्यमातून भुयारी बोगदा बांधण्यात येणार; ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह हे अंतर काही मिनिटांत पार!

हे लक्षात घेता, आपले पॅन कार्ड ‘इनअॅक्टिव्ह’ झाले असेल, तर ते तातडीने ‘अॅक्टिव’ करणे आवश्यक आहे. आपले ‘इनअॅक्टिव्ह’ पॅन कार्ड पुढीलप्रमाणे ‘अॅक्टिव्ह’ करता येऊ शकते.

१) https://www.incometax.gov.in/ice/foportal या प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग-इन करून पॅन-आधार लिंकिंग पर्यायावर क्लिक करून आपला ‘पॅन’ तपशील भरून CHALLAN NO./ITNS २८० वर पॅन-आधार लिंक रिक्वेस्ट सबमिट करा.

२) पेमेंट मोड निवडून त्यानुसार रु. १००० चे पेमेंट ऑनलाईन करा.

३) तीस दिवसांत आपले पॅन कार्ड ‘अॅक्टिव्ह’ होईल.

आपण जर अनिवासी भारतीय असाल तर बहुधा आपल्याकडे आधार कार्ड असणार नाही. तरी सुद्धा आपण आपले पॅन कार्ड ‘अॅक्टिव्ह’ करू शकता. त्यासाठी प्राप्तिकर विभागाला आपल्या पासपोर्टची कॉपी जोडून अनिवासी भारतीय असल्याबाबतची रुजवात करून द्यावी लागते.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com