Adani Green Energy : अदानींच्या ग्रीन एनर्जीच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला तारळे खोऱ्यातील हजारो नागरिकांचा विरोध

कळंबे (ता. पाटण) येथील प्रस्तावित अदानी ग्रीन एनर्जीच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला तारळे खोऱ्यातील हजारो नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उंचावून कडाडून विरोध केला.
Adani Green Energy
Adani Green Energy Sakal

सातारा : कळंबे (ता. पाटण) येथील प्रस्तावित अदानी ग्रीन एनर्जीच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला तारळे खोऱ्यातील हजारो नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उंचावून कडाडून विरोध केला.

आमच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने प्रसंगी रक्त सांडण्याचा निश्चयही करण्यात आला. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत नको, अशी भूमिका उपस्थित हजारो नागरिकांनी घेत या प्रकल्पाला एकमुखी विरोध केला.

कळंबे येथे १५०० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हरकती मागवल्या होत्या. लोकांना पूर्णतः अंधारात ठेवून हा प्रकल्प रेटून नेला जात असल्याची जाणीव झाल्याने व याचे भविष्यातील स्थानिकांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन या विरोधात कृती समितीने जनतेच्या माध्यमातून उठाव केला.

यासाठी महिनाभर समितीने परिश्रम घेतले होते. यामुळे याविरोधात हजारो हरकती दाखल झाल्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आज कळंबे येथे जनसुनावणी आयोजित केली होती.

कंपनीच्या वतीने प्रोजेक्टरवर प्रकल्प वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली; पण सुरुवातीपासूनच प्रकल्पाचा चुकीचा सर्व्हे झाल्याचे सिद्ध होत गेले. मुळात झालेला सर्व्हे हा प्रत्यक्ष जागेवर न करता एखाद्या प्रकल्पाची कॉपी तयार केली असून, अनेक चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बाबी या वाचनातून समोर आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com