Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Adani Group’s Strategic Move in Infrastructure - जाणून घ्या, अशी कोणती कंपनी आहे ज्यासाठी अदानी ग्रुपवर एवढी मोठी बोली लावायलाच नाहीतर अ‍ॅडव्हान्स पेमेंटसाठी देखील तयार आहे.
Adani Group steps in with a ₹12,500 crore proposal to acquire debt-ridden Jaypee Associates Ltd, aiming to expand its infrastructure footprint.
Adani Group steps in with a ₹12,500 crore proposal to acquire debt-ridden Jaypee Associates Ltd, aiming to expand its infrastructure footprint. esakal
Updated on

भारतातील बलाढ्य उद्योग ग्रुप असलेल्या अदानी ग्रुपने दिवाळखोरीत निघालेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (JAL) वर १२,५०० कोटी रुपयांचा डाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, यासंबधी माहिती असलेल्यांचे म्हणणे आहे की JAL ग्रुप खरेदी करण्यासाठी अदानी ग्रुप सर्वात मोठा बोली लावणारा ठरला आहे.

प्राप्त माहितीतनुसार ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आगाऊ पैसे देण्याचे आश्वासन देऊन अदानी ग्रुप एक मजबूत दावेदार बनला आहे. डालमिया ग्रुप, JSPL (नवीन जिंदाल), वेदांत आणि PNC इन्फ्राटेक देखील JAL खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. मात्र या सर्वांमध्ये, अदानी ग्रुप सर्वाधिक बोली लावून शर्यतीत आघाडीवर आहे.

अदानी ग्रुप JAL खरेदी का इच्छुक? -

अनेक मोठ्या कंपन्या जयप्रकाश असोसिएट्स खरेदी करण्यात रस घेत आहेत. अदानी ग्रुपला सिमेंट, रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवायचा आहे, म्हणून ते कंपनी विकत घेऊ इच्छितात. JAL खरेदी केल्याने अदानी ग्रुपला मध्य आणि उत्तर भारतात आपली पकड मजबूत करण्यास मदत होईल. JAL च्या शेअरची किंमत फक्त 3 रुपये आहे. त्यांच्या शेअर्ससमोर ट्रेडिंग रिस्ट्रिक्टेडचा संदेश दिसतो. अदानी ग्रुपने केलेल्या अधिग्रहणामुळे कंपनीचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.

Adani Group steps in with a ₹12,500 crore proposal to acquire debt-ridden Jaypee Associates Ltd, aiming to expand its infrastructure footprint.
Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

जेएल कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि दिवाळखोरीतून जात आहे. कंपनीवर अनेक बँकांचे कर्ज देखील आहे. एकूण २५ बँकांनी मिळून JAL ला ४८,००० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि IDBI बँक यांचा समावेश आहे. १२ मार्च रोजी या बँकांनी कंपनीचे एकूण ४८,००० कोटी रुपयांचे कर्ज राष्ट्रीय मालमत्ता पुनर्निर्माण कंपनी (NARCL) ला १२,७०० कोटी रुपयांना विकले.

Adani Group steps in with a ₹12,500 crore proposal to acquire debt-ridden Jaypee Associates Ltd, aiming to expand its infrastructure footprint.
Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

जयप्रकाश असोसिएट्स ही एक मोठी पायाभूत सुविधांची कंपनी आहे.  जी रिअल इस्टेट, सिमेंट, वीज आणि हॉटेल्स अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. JAL च्या सिमेंट प्लांटची क्षमता १ कोटी टन आहे. कंपनीकडे पाच हॉटेल्ससह एक खत कारखाना देखील आहे. याशिवाय, JAL कडे नोएडा एक्सप्रेसवे आणि बुद्ध नॅशनल सर्किटवर २५०० एकर जमीन आहे, जिथे पूर्वी फॉर्म्युला वन शर्यती होत असत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com