Adani : ‘अदानी’कडून ६० हजार कोटींची गुंतवणूक; विमानतळांवरील पायाभूत सुविधांसाठी दहा वर्षांत करणार खर्च

अदानी समूह विमानतळ व्यवसायात ६०,००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक येत्या दहा वर्षांत विमानतळांवरील पायाभूत सुविधांसह धावपट्टी, टॅक्सी वे, विमान पार्किंग स्टँड आणि टर्मिनलवर खर्च करणार आहे.
Adani Group plans to invest 60000 crore over the next decade in its airport business
Adani Group plans to invest 60000 crore over the next decade in its airport businessSakal

मुंबई : अदानी समूह विमानतळ व्यवसायात ६०,००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक येत्या दहा वर्षांत विमानतळांवरील पायाभूत सुविधांसह धावपट्टी, टॅक्सी वे, विमान पार्किंग स्टँड आणि टर्मिनलवर खर्च करणार आहे.

विमानतळ टर्मिनल आणि धावपट्टीच्या क्षमतेसाठी पुढील पाच वर्षांत ३०,००० कोटी आणि शहराच्या विकासासाठी पुढील १० वर्षांत ३०,००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती अदाणी पोर्ट्‌स आणि सेझचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदाणी यांनी दिली. दरम्यान, ही गुंतवणूक नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी खर्च करण्यात आलेल्या १८,००० कोटींच्या व्यतिरिक्त असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com