
अदानी ग्रुपचे कर्ज गेल्या एका वर्षात 20% वाढले असून आता त्यातील निम्मे कर्ज भारतीय बँका व वित्तीय संस्थांकडून घेतले आहे.
सरकारी बँका, NBFC आणि इतर संस्थांचा ग्रुपवरील एक्सपोजर मोठ्या प्रमाणात वाढला असून डॉलर बाँडचा वाटा कमी झाला आहे.
तरीही ग्रुपकडे 60,000 कोटींचा कॅश रिझर्व्ह आहे.
Adani Group: उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुपचे भारतीय बँकांवरील अवलंबित्व झपाट्याने वाढले आहे. ग्रुपच्या एकूण कर्जापैकी जवळपास निम्मे कर्ज म्हणजेच सुमारे 2.6 लाख कोटी हे भारतीय बँका व वित्तीय संस्थांकडून घेतले आहे. एक वर्षापूर्वी हे प्रमाण 40% होते.