
Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील दागिने विक्रेत्यांनी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यंदा 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे आणि सोने प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या आसपास असतानाही ग्राहकांची दागिन्यांची मागणी वाढेल, असा आशावाद विक्रेत्यांमध्ये आहे.
कल्याण ज्वेलर्स, पीपी ज्वेलर्स बाय पवन गुप्ता, झेन डायमंड, इरास्वा आणि अकोइरा बाय ऑगमॉन्ट यांसारख्या विक्रेत्यांनी मेकिंग चार्जेसवर सवलती, सोन्याचे नाणे, एक्सचेंज स्कीम्स आणि प्राइस लॉक ऑफर्स दिल्या आहेत.