
Anand Mahindra on Tesla: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला भारतात दाखल होणार आहे. इलॉन मस्कची कंपनी टेस्लाने यासाठी भारतात नोकरभरतीची प्रक्रियाही सुरू केली आहे. टेस्ला या वर्षी एप्रिलपासूनच आपल्या वाहनांची विक्री सुरू करू शकते. टेस्ला भारतात आयात वाहने विकण्याच्या तयारीत आहे.