Anant-Radhika Wedding: शाहरुख सलमानला नाचवणाऱ्या अंबानींच्या पोराच्या लग्नात खर्च होतोय तरी किती? जगभरातले रेकॉर्ड होणार ब्रेक

Anant-Radhika Wedding Cost: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुक्रवारी, 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस लग्नसोहळा असणार आहे.
Anant-Radhika Wedding
Anant-Radhika Wedding CostSakal

Anant-Radhika wedding Expense: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुक्रवारी, 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस लग्नसोहळा असणार आहे. या लग्नाला देश-विदेशातील अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाच्या खर्चाची बरीच चर्चा आहे. अंबानींच्या घरातील हे लग्न जगातील सर्वात महागडे लग्न ठरणार असल्याचे मानले जात आहे. अनंत-राधिकाच्या लग्नात 2500 खाद्यपदार्थ असतील, रिटर्न गिफ्ट म्हणून करोडोंची घड्याळं, सुरक्षेसाठी NSG कमांडो... अशा सगळ्या व्यवस्था केल्या जातील. जाणून घेऊया या लग्नात किती खर्च करण्यात आला आहे?

लग्नपत्रिकेवर लाखोंचा खर्च

अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. सुवर्ण लग्नपत्रिकेसोबतच प्रत्येक पाहुण्याला खास भेटवस्तू पाठवण्यात आल्या होत्या. लग्नपत्रिकेत सोन्या-चांदीच्या देवाच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. किंमत जाहीर केली नसली तरी या लग्नासाठी अंबानींनी एका कार्डवर 6 ते 7 लाख रुपये खर्च केल्याचे मानले जात आहे.

Anant-Radhika Wedding
Mukesh Ambani : करोडपती असणारे मुकेश अंबानी नाश्त्यामध्ये रोज खातात 'हा' एकच पदार्थ

लग्नाआधी 1200-1500 कोटी रुपये खर्च केले

लग्नाआधी अनंत-राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स आयोजित करण्यात आले होते. मार्चमध्ये जामनगरमध्ये पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे देशभरातून आणि जगभरातून विशेष पाहुणे आले होते. इवांका ट्रम्प ते मार्क झुकरबर्ग या समारंभाला उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या प्री-वेडिंगमध्ये रिहानाने परफॉर्म केला होता.

या कार्यक्रमाला 1200 पाहुणे उपस्थित होते. या सोहळ्यावर अंबानी कुटुंबाने 1200 कोटी रुपये खर्च केले होते. दुसरे प्री-वेडिंग इटलीतील क्रूझवर आयोजित करण्यात आले होते. 4 दिवस चाललेल्या या दुसऱ्या प्री-वेडिंगला 800 पाहुण्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अंबानींनी पाहुण्यांसाठी 10 चार्टर विमाने, वैयक्तिक कर्मचारी, आलिशान वाहनांची व्यवस्था केली होती.

Anant-Radhika Wedding
Ambani Wedding : ना कोणता थाट, ना कोणता मानपान..! अंबानींच्या या लेकाने साध्या पद्धतीने केले होते लग्न

अनंत-राधिकाच्या लग्नात किती खर्च येणार?

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबातील हे लग्न सर्वात महागडे लग्न ठरणार आहे. लग्नाचा खर्च ढोबळमानाने काढला आहे. जर आपण रिहाना, जस्टिन बीबरचा परफॉर्मन्स, लग्नाच्या निमंत्रणाचा खर्च सुमारे 7000 डॉलर्स, सुरक्षा, खाजगी जेट, लक्झरी सूट इत्यादींचा समावेश केला तर अनंत-राधिकाच्या लग्नाचा एकूण खर्च सुमारे 320 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 26,72,14,40,000 रुपयांपर्यंत असू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com