Ambani Wedding : ना कोणता थाट, ना कोणता मानपान..! अंबानींच्या या लेकाने साध्या पद्धतीने केले होते लग्न

अंबानींच्या या ग्रँड सोहळ्याला देशासह सातासमुद्रापार दिग्गजांनी हजेरी लावलीय. देशभरात या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पण तुम्हाला माहितीय का अंबानी कुटुंबातील एका मुलाचे लग्न अगदी साध्या पद्धतीनं पार पडले आहे.
Ambani Wedding No show no grand function this jai anmol son of Ambani had a simple wedding
Ambani Wedding No show no grand function this jai anmol son of Ambani had a simple wedding

गेल्या काही महिन्यांपासून अनंत अंबानींच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. अनंत राधिका उद्या म्हणजेच 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. तत्पुर्वी अनेक ग्रँड सोहळे पार पडले आहेत. जामनगर आणि इटलीमध्ये प्री-वेडिंग फंक्शन्ससह मुंबईतील भव्य लग्नासोहळ्यावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत.

अंबानींच्या या ग्रँड सोहळ्याला देशासह सातासमुद्रापार दिग्गजांनी हजेरी लावलीय. देशभरात या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पण तुम्हाला माहितीय का अंबानी कुटुंबातील एका मुलाचे लग्न अगदी साध्या पद्धतीनं पार पडले आहे.

Ambani Wedding No show no grand function this jai anmol son of Ambani had a simple wedding
Anant Ambani - Radhika Merchant Wedding : "२९ रुपयांचा रिचार्ज जस्टिन बीबरच्या खिशात ?" मराठी अभिनेत्री अंबानी लग्नसोहळ्यावर थेट बोलली

अनंत अंबानींच्या या शाही लग्नात सध्या चर्चा रंगलीय ती म्हणजे जय अनमोल अंबानीची. जय अनमोल अंबानी हे अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. जय अनमोल अंबानी यांचे 2022 मध्ये क्रिशा शाहसोबत अगदी साध्या पद्धतीने लग्न पार पडले होते. सध्या त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनमोल आणि क्रिशा यांच्या लग्नात केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी होता. ना कोणता जन्श, ना कोणता शाही थाट.. अगदी साध्या पद्धतिनं त्यांनी लग्नगाठ बांधली.

Ambani Wedding No show no grand function this jai anmol son of Ambani had a simple wedding
Mukesh Ambani : करोडपती असणारे मुकेश अंबानी नाश्त्यामध्ये रोज खातात 'हा' एकच पदार्थ

अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर अनमोल आणि क्रिशा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्रिशा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फॅमिली फोटो पोस्ट करत असते.

अनमोल अंबानी सध्या काय करतात?

सध्या अनमोल अनिल अंबानींची कर्जात बुडालेली कंपनी वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचे समजते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या व्यवसायात सहभाग घेतला. 2016 मध्ये अनमोल यांनी रिलायन्स कॅपिटल बोर्डात सहभाग घेतला.

क्रिशा शाह ही नीलम आणि निकुंज शाह यांची धाकटी मुलगी आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातून पॉलिटिकल इकॉनॉमिक्समध्ये पदवी मिळवल्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सोशल पॉलिसी अँड डेव्हलपमेंटमध्ये शिक्षण पूर्ण केले. काही वर्षे ब्रिटनमध्ये एक्सेंचरमध्ये काम केल्यानंतर ती भारतात परतली.

Ambani Wedding No show no grand function this jai anmol son of Ambani had a simple wedding
Ambani Family Sangeet: राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला धोनी, हार्दिकसह अनेक क्रिकेटपटूंही हजेरी, पाहा Video

क्रिशाचे वडील निकुंज शहा हे मुंबईतील यशस्वी व्यवसाय असलेल्या निकुंज एंटरप्रायझेसचे सीएमडी होते. 2021 मध्ये त्यांचे निधन झाले. त्याची आई नीलम शाह फॅशन डिझायनर आहे. क्रिशा तिच्या भावासोबत कंपनी सांभाळते. त्यांची बहीण नृती शाह ही ब्युटी आणि फूड ब्लॉगर आहे.

हे अंबानी कुटुंब लाईटामपासून दुर आहे. अनिल अंबानी यांच्या मुलाला आणि सुनेला आपल्या परिवारासोबत अधिक वेळ घालवायला आवडते. त्यामुळं सुन क्रिशाचे फोटो खुप कमी व्हायरल होताना दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com