Layoffs in Argentina: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष करणार 70,000 सरकारी कर्मचाऱ्यांची कपात; काय आहे कारण?

Layoffs in Argentina: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी येत्या काही महिन्यांत 70,000 सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची योजना जाहीर केली आहे. 26 मार्च रोजी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
Argentine President Javier Milei has declared his intention to lay off 70,000 government workers
Argentine President Javier Milei has declared his intention to lay off 70,000 government workers Sakal

Layoffs in Argentina: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर माइली यांनी येत्या काही महिन्यांत 70,000 सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची योजना जाहीर केली आहे. 26 मार्च रोजी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना जेवियर माइली यांनी सार्वजनिक कामे थांबवण्याचा, निधी कमी करण्याचा आणि अनेक सामाजिक कल्याण कार्यक्रम थांबवण्याचा त्यांचा निर्णय सांगितला.

अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर माइली यांना कामगार संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. एका कामगार संघटनेने 26 मार्च रोजी संप सुरू केला, तर सरकारी अहवालात जेवियर माइली यांनी डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यापासून खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या पगारात मोठी घसरण झाली आहे.

आर्थिक संकटातून जात असलेल्या देशाची अर्थव्यवस्था बदलण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आल्याचे जेवियर माइली यांच्या प्रशासनाने सांगितले. जेवियर माइली यांनी 10 डिसेंबर 2023 रोजी देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

गेल्या वर्षाच्या अखेरीस अर्जेंटिनातील महागाई 200 टक्क्यांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता होती. सरकारी नियम, निर्यात आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करण्याची परवानगी देण्याचे आश्वासन जेवियर माइली यांनी निवडणुकीत दिले होते. या कर्मचारी कपातीला विरोध होत असला तरी माइली यांनी आपल्या धोरणांवर ठाम राहण्याची शपथ घेतली आहे.

Argentine President Javier Milei has declared his intention to lay off 70,000 government workers
Baba Kalyani: बाबा कल्याणींच्या पुतण्याने कोर्टात दाखल केली याचिका; काय आहे प्रकरण?

सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करणार

अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष म्हणाले की देशाला पुनर्रचनेच्या मार्गावर नेणे, लोकांना स्वातंत्र्य आणि स्वायत्तता परत करणे आणि देशाच्या आर्थिक वाढीस अडथळा आणणारे नियम बदलणे हे त्यांचे ध्येय आहे.

अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष देशात सुमारे 300 बदल करणार आहेत. अनेक सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करणे, भाडेकरू, कर्मचारी आणि दुकानदार यांच्यासाठी अनुकूल नियम बनवणे, ऊर्जा आणि वाहतूक सबसिडी कमी करणे आणि काही सरकारी मंत्रालये बंद करणे या निर्णयांचा समावेश यात आहे.

Argentine President Javier Milei has declared his intention to lay off 70,000 government workers
LIC: एलआयसी बनली जगातील सर्वात मजबूत विमा कंपनी; SBI-HDFC सह अनेक कंपन्यांना टाकले मागे

जेवियर माइली हे आक्षेपार्ह विधानांमुळे टेलिव्हिजन वाहिन्यांवर चर्चेत असतात. ते एक अर्थशास्त्रज्ञ आणि माजी राजकीय भाष्यकार आहेत ज्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल करण्याचे आश्वासन दिले होते. आर्थिक संकटामुळे निराश झालेल्या अर्जेंटिनाच्या जनतेच्या पाठिंब्याने त्यांची देशाच्या नव्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com