
Health Insurance Policy: सैफ अली खानच्या 35.95 लाख रुपयांच्या हॉस्पिटलच्या बिलावरून वाद सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य सेवा आणि विमा पॉलिसींच्या वाढत्या किमतींवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतील एका सर्जनने विमा कंपन्या 5-स्टार हॉस्पिटल आणि लहान हॉस्पिटलसाठी वेगवेगळ्या पॉलिसी राबवतात हे सांगितले आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर आणि खर्चावर मोठा ताण पडत आहे.