Ashneer Grover: नारायण मूर्तींच्या वादात अश्नीर ग्रोव्हरची उडी; 70 तास काम करणे म्हणजे...

Ashneer Grover: एनआर नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे.
Ashneer Grover
Ashneer GroverSakal

Ashneer Grover: इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. आता भारतपेचे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. नारायण मूर्ती यांनी म्हटले होते की, भारतातील तरुणांनी दर आठवड्याला 70 तास काम केले पाहिजे. यावर आता ग्रोव्हरने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

इन्फोसिसच्या माजी अध्यक्षांच्या विधानावर सोशल मीडियावर वाद चालू आहे. सर्वसामान्यांना नारायण मूर्ती यांचे विधान आवडलेले नाही, असे ग्रोव्हरचे यांचे मत आहे. त्यांनी शुक्रवारी X वर याबद्दल पोस्ट केली.

त्यांनी लिहिले की, लोकांना मूर्ती यांचे हे विधान आवडले नसेल, कारण आताही कार्यालयात कामाचा रिझल्ट तासांमध्ये मोजला जातो. दुसरे म्हणजे तरुणांच्या आळशीपणामुळे भारत विकसित देश होऊ शकलेला नाही असे अनेक लोकांना वाटते.

Ashneer Grover
RIL Q2 Result: देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा निकाल जाहीर, मुकेश अंबानी म्हणाले, प्रत्येक बिझनेसमध्ये नफा

पॉडकास्ट 'द रेकॉर्ड' मध्ये, मूर्ती यांनी भारतातील कमी उत्पादकतेबद्दल चिंता व्यक्त केली. भारताला जगातील सर्वात बलाढ्य देशांशी स्पर्धा करायची असेल तर तरुणांना दर आठवड्याला 70 काम करावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

याचा अर्थ तरुणांना आठवड्यातील एकही दिवस सुट्टी न घेता दिवसाचे 10 तास काम करावे लागणार आहे. सध्या देशात सुमारे 45 तास काम करण्याचा ट्रेंड आहे. केंद्र सरकारसह काही कार्यालयांमध्ये आठवड्यातून पाच दिवस काम केले जाते. शनिवार आणि रविवारी सुट्टी असते.

Ashneer Grover
Mukesh Ambani: उद्योगपती मुकेश अंबानींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; 20 कोटी रुपयांची केली मागणी

चेतन भगत यांनी केला विरोध

लेखक चेतन भगत यांनी मूर्ती यांच्या विचारांशी असहमती व्यक्त करत आठवड्यातून 35 तास काम केले पाहिजे असे सांगितले. 70 तास काम करणे आवश्यक नाही.

आम्ही आमच्या कामासाठी 35 तास घालवत आहोत ते आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. तुम्ही अजूनही खूप काही साध्य करू शकता असेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com