
सन टीव्ही नेटवर्कने इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ लीगचा नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघ तब्बल ₹1,161 कोटींना खरेदी केला.
या खरेदीमुळे सन टीव्हीची आता तीन खंडांमध्ये क्रिकेट फ्रँचायझी असेल.
‘द हंड्रेड’ची वाढती लोकप्रियता आणि नफा पाहून हा करार केला आहे.
Kavya Maran Expands Cricket Empire: चेन्नईमधील मीडिया सन टीव्ही नेटवर्क आता जागतिक क्रिकेटमध्ये आपले पाय आणखी घट्ट रोवत आहे. आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादची मालकी असलेल्या कंपनीने आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB)च्या ‘द हंड्रेड’ लीगमधील नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघ तब्बल 100.5 मिलियन पौंडला (सुमारे ₹1,161 कोटी) खरेदी केला आहे.