Bajaj Auto: जगात पोहचलेलं 'हमारा बजाज' ऑटो पुण्यात कसं सुरू झालं?

Bajaj Auto: बजाज चेतकच्या डिलिव्हरीच्या तारखेनुसार लोकं लग्नाच्या तारखा पुढे ढकलत असत. असा हा काळ होता.
Bajaj Auto
Bajaj AutoSakal

Bajaj Auto: एक काळ असा होता जेव्हा देशात लग्नात हुंडा देण्याची वाईट प्रथा होती तेव्हा लग्नामध्ये बजाज चेतक गाडी मिळावी अशी मागणी मुलाकडून होत होती. त्याकाळी गाडी मिळण्यासाठी वरीच वेटींग असायची. पण लोक बजाज चेतकच्या डिलिव्हरीच्या तारखेनुसार त्यांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलत असत. असा हा काळ होता.

बजाज ऑटोने 51 वर्षांपूर्वी भारतातील सामान्य माणसाला किंवा मध्यमवर्गीयांना त्यांच्या आयुष्यातील पहिले स्वप्न साकार करण्याची संधी दिली होती. या स्वप्नाचे नाव होते बजाज चेतक, दिवंगत उद्योगपती राहुल बजाज यांनी 1972 मध्ये ही 2-स्ट्रोक इंजिन स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली.

तेव्हा भारतात दुचाकींसाठी फारसे पर्याय नव्हते, बजाजची स्वतःची स्कूटर बजाज होती. पण बजाज चेतकच्या वैशिष्ट्यांमुळे ती प्रत्येक घरात पोहोचली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वेगवेगळ्या कार्यकाळात देशातील वाहन क्षेत्राची चांगली वाढ झाली. 1972 ची बजाज चेतक असो किंवा 1983 ची मारुती सुझुकी असो, दोघांनीही वाहन क्षेत्रात आपली छाप त्या काळात पाडली.

Bajaj Auto
NPS Rules Change: वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय पेन्शन योजनेत होणार बदल; काय आहे मोदी सरकारचा नवा प्लॅन?

पण देशात परवाना राजवटीचा हा काळ होता. कंपन्यांचा उत्पादन कोटा निश्चित करण्यात आला. बजाज ऑटोला वर्षाला फक्त 20,000 स्कूटर्सचे उत्पादन करण्याची परवानगी होती. पण 'हमारा बजाज' जाहिरातीची लोकप्रियता आणि बजाज चेतकची मागणी इतकी वाढली की लोक या स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी 10 वर्षे वाट पाहत होते.

स्कूटर उत्पादक ते मोटारसायकल उत्पादक अशी आपली प्रतिमा बदलून, कंपनीने पुण्यातील चाकण येथे प्लांट उभारला. आज बजाज जगभरातील 50 देशांमध्ये व्यवसाय करत आहे.

Bajaj Auto
Luxury Housing Price: जगभरात आलिशान घरांच्या किंमतीत वाढ; टॉप 5 शहरांमध्ये मुंबईचा समावेश

कंपनी मेसर्स बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून 29 नोव्हेंबर 1945 रोजी अस्तित्वात आली. सुरुवातीला ते देशात दुचाकी आणि तीन चाकी वाहने आयात करून विकत असे. 1959 नंतर कंपनीने दुचाकी आणि तीनचाकी वाहने तयार करण्यास सुरुवात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com