Bank Holiday in May 2023: मे महिन्यात 'एवढ्या' दिवस बँका राहणार बंद; पहा सुट्ट्यांची यादी

मे महिना सुरू होण्यापूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
Bank Holidays
Bank Holidays Sakal

Bank Holiday in May 2023: आर्थिक वर्ष 2023-24 चा पहिला महिना संपत आला आहे आणि नवीन महिना काही दिवसात सुरू होईल. अशा स्थितीत मे महिना सुरू होण्यापूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पैशांचे व्यवहार, डिमांड ड्राफ्ट प्राप्त करणे, चेक जमा करणे अशा अनेक कामांसाठी बँकेची आवश्यकता असते. बँकेला सुट्टी असेल तर अनेक वेळा ग्राहकांची महत्त्वाची कामे रखडतात.

तुम्हालाही मे महिन्यात काही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर तुम्हाला बँकेला कधी सुट्टी असते याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

मे महिन्यात एकूण किती दिवस बँका बंद राहतील?

मे 2023 मध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. सण, जयंती इत्यादी कारणांमुळे बँकांना एकूण 12 दिवस सुट्टी असेल. त्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.

मे महिन्यात महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, महाराणा प्रताप जयंती असे अनेक महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे राज्यामध्ये अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

मे 2023 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी?

  • 1 मे 2023 - महाराष्ट्र दिन/मे दिनानिमित्त बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि त्रिवेंद्रम येथे बँका बंद राहतील.

  • 5 मे 2023- बुद्ध पौर्णिमेनिमित्त आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

  • 7 मे 2023- रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

  • 9 मे 2023- रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त कोलकातामध्ये बँका बंद राहतील.

  • 13 मे 2023- दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

  • 14 मे 2023- रविवारमुळे बँका बंद राहतील.

  • 16 मे 2023- सिक्कीममध्ये राज्य दिनानिमित्त बँका बंद राहतील.

  • 21 मे 2023- रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल.

Bank Holidays
Blinkit: ब्लिंकिट कंपनीला मोठा धक्का! 1 हजार कर्मचाऱ्यांंनी सोडली कंपनी; काय आहे कारण?
  • 22 मे 2023- महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शिमल्यात बँका बंद राहतील.

  • 24 मे 2023- काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त त्रिपुरातील बँका बंद राहतील.

  • 27 मे 2023- चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.

  • 28 मे 2023- रविवारमुळे संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.

बँकांना सुट्टी असताना अनेक महत्त्वाची कामे रखडतात. अशा परिस्थितीत, ग्राहक मोबाइल किंवा नेट बँकिंगद्वारे काही काम पूर्ण करू शकतात.

तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. याशिवाय UPI च्या माध्यमातूनही पैसे ट्रान्सफर करता येतात. तसेच तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम वापरू शकता.

Bank Holidays
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com