Bank Of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून गृहकर्जाच्या व्याजदरात घट

गृहकर्जाचा व्याजदर आधीच्या ८.६० टक्क्यांवरून ८.५० टक्के, तर वाहनकर्जाचा व्याजदर आधीच्या ८.९० टक्क्यांवरून ८.७० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला
bank of maharashtra cuts home car loan interest rates
bank of maharashtra cuts home car loan interest ratessakal

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्राने येत्या १४ ऑगस्टपासून गृहकर्ज आणि वाहनकर्जाचे व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. गृहकर्जाचा व्याजदर आधीच्या ८.६० टक्क्यांवरून ८.५० टक्के, तर वाहनकर्जाचा व्याजदर आधीच्या ८.९० टक्क्यांवरून ८.७० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या कर्जांवरील प्रक्रिया शुल्कदेखील माफ करण्यात आले आहे.

यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर बँकेने या दोन महत्त्वाच्या कर्जांवरील व्याजदर घटवून सकारात्मक पाऊल उचलले आहे. बँकेने ‘उडान’ मोहिमेअंतर्गत शैक्षणिक कर्ज व सुवर्ण कर्जावरील प्रक्रिया शुल्कदेखील माफ केले आहे.अधिकाधिक ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेने केले आहे.

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊन त्यांच्या विविध वित्तीय गरजा पूर्ण करण्याचा बँक सातत्याने प्रयत्न करत असते. बँक ऑफ महाराष्ट्राने गृह व चारचाकी वाहन कर्जावरील घटविलेल्या व्याजदरांची व माफ केलेल्या प्रक्रिया शुल्काची; तसेच बँक पुरवीत असलेल्या सर्वांगीण वित्तीय सेवांची माहिती बँकेच्या https://bankofmaharashtra.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे बँकेने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com