Bank Overdraft: बँक खाते रिकामे असले तरी मिळणार पैसे, जाणून घ्या काय आहे ओव्हरड्राफ्ट सुविधा?

Bank Overdraft Facility: जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा अनेक वेळा आपले बँक खाते रिकामे असते.
Bank Overdraft Facility
Bank Overdraft FacilitySakal

Bank Overdraft Facility: जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा अनेक वेळा आपले बँक खाते रिकामे असते. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय केले पाहिजे? ज्याच्या मदतीने तुम्ही या संकटाचा सामना करू शकता.

या सुविधेच्या मदतीने, तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही पैसे काढू शकाल. होय, आम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेबद्दल बोलत आहोत. ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा बँकांनी दिली आहे.

काय आहे बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा?

ओव्हरड्राफ्ट सुविधा हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामध्ये बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) त्यांच्या ग्राहकांना खात्यात असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी देतात.

या सुविधेअंतर्गत तुम्ही तुमच्या खात्यात जमा केलेल्या पैशांपेक्षा जास्त कर्ज किंवा निधी घेऊ शकता. कर्ज आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा यामध्ये फरक आहे. उदाहरणार्थ, कर्जामध्ये, व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते, तर ओव्हरड्राफ्ट सुविधेत, व्याजाची गणना दररोज किती रक्कम बँकेतून काढता त्यावर केली जाते.

सर्वात मोठा फरक म्हणजे तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधेवर जास्त व्याज द्यावे लागते. ओव्हरड्राफ्ट सुविधेत तुम्हाला किती रक्कम मिळेल हे बँकेवर अवलंबून आहे.

Bank Overdraft Facility
Virender Sehwag: विरेंद्र सेहवागला शेअर बाजाराची भीती का वाटते? ट्विट करत सांगितले...

किती प्रकारच्या आहेत ओव्हरड्राफ्ट सुविधा?

दोन प्रकारच्या ओव्हरड्राफ्ट सुविधा आहेत. पहिली सुविधा सुरक्षित आहे आणि दुसरी सुविधा असुरक्षित आहे. सुरक्षित ओव्हरड्राफ्ट अंतर्गत, ग्राहकांकडून बँका काही गोष्टी तारण घेते, जसे की FD, शेअर्स, घर, विमा इ.

जर तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नसेल, तरीही तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल, परंतु प्रक्रिया थोडी वेगळी असेल. याला असुरक्षित ओव्हरड्राफ्ट म्हणतात. या असुरक्षित ओव्हरड्राफ्टमध्ये तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने पैसे काढू शकता.

Bank Overdraft Facility
2000 Rupee Note: आजपासून 'या' ठिकाणी 2,000 रुपयांची नोट चालणार नाही, काय आहे कारण?

बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांद्वारे ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. बँका त्यांच्या काही ग्राहकांना पूर्व-मान्यता आधारावर ही सुविधा देतात तर काही ग्राहकांना त्यासाठी अर्ज करून बँकेला विनंती करावी लागते.

तुम्ही त्यासाठी नेट बँकिंगद्वारे किंवा बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता. काही बँका या सुविधेसाठी शुल्क आकारतात, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com