
Raghuram Rajan Budget 2025: आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी अर्थसंकल्पापूर्वी भारताच्या घसरत चाललेला जीडीपी आणि मध्यमवर्गाच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आर्थिक वर्ष 2025 मध्ये जीडीपी वाढीचा दर फक्त 6.4% असेल असा अंदाज आहे, जो गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी आहे.