Business Idea: 9 ते 5 नोकरीचा कंटाळा आलाय? घरी बसून करा हे 5 बिझनेस, पगारापेक्षा जास्त कमवाल

Best Business Idea: तुमच्या मेहनतीने तुम्ही हे व्यवसाय कालांतराने वाढवू शकता
Best Business Idea
Best Business IdeaSakal

Best Business Idea: सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत काम करायचे नसेल तर तुम्ही नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता. एवढेच नाही तर कोरोना काळात सुरू झालेले वर्क फ्रॉम होम देखील खूप लोकप्रिय झाले आहे. लोक आता अशी नोकरी निवडण्यास प्राधान्य देतात, जे घरी राहून काम करता येईल.

बेरोजगारी ही देशातील मोठी समस्या आहे. प्रत्येक क्षेत्रात नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत लोक व्यवसाय करण्यावर भर देत आहेत. जर तुम्ही शिक्षित असाल आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहायचे असेल तर असे अनेक छोटे व्यवसाय आहेत जे तुम्ही तुमच्या घरापासून सुरू करू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच 5 व्यवसायांबद्दल सांगणार आहोत, जे घरी सुरू करता येतील. तुमच्या मेहनतीने आणि क्षमतेने तुम्ही हे व्यवसाय कालांतराने वाढवू शकता, तसेच इतरांनाही रोजगार देऊ शकता.

1. कोचिंग क्लासेस

तुम्ही शिक्षित असाल आणि एखाद्या विषयावर तुमची पकड असेल, तर तुम्ही मुलांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिकवू शकता. गेल्या काही वर्षांत ऑनलाइन कोचिंगकचा कल झपाट्याने वाढला आहे.

2. ब्लॉगिंग

तुमची एखाद्या विशिष्ट विषयावर पकड असेल, तर तुम्ही डिजिटल इंडियाच्या युगात घरी बसून तुम्ही लेख शेअर करू शकता. विशेषत: तुम्हाला कोणत्याही विषयावर मजकूर लिहिण्याची आवड असेल, तर तुम्ही अनेक संस्थांमध्ये अर्धवेळ नोकरी करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या विषयावर व्हिडिओ बनवून तो यूट्यूबवर अपलोड करू शकता. आजच्या युगात यूट्यूब हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. काही ब्लॉग प्लॅटफॉर्म वाचकांनुसार लेखकांना पैसे देतात.

3. ऑनलाइन व्यवसाय

अगदी कमी पैशात तुम्ही ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही Flipkart-Amazon सारख्या वेबसाइट्सद्वारे उत्पादने विकू शकता. यासाठी प्रथम तुम्हाला ही माहिती गोळा करावी लागेल की कोणत्या उत्पादनाला जास्त मागणी आहे.

तुम्ही त्या उत्पादनाच्या निर्मात्याशी थेट संपर्क साधू शकता. तुम्ही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंमत आणि विक्री किंमत यांची तुलना करा, त्यानंतर तुम्हाला बचतीची कल्पना येईल. याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय हळूहळू वाढवू शकता. मोठ्या शहरात राहून हा व्यवसाय सहज करता येतो.

4. प्लेसमेंट सेवा

सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये नियुक्ती केवळ प्लेसमेंट एजन्सीद्वारे केली जाते. विशेषत: सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, मदतनीस आणि सर्व प्रकारचे तांत्रिक लोक हे प्लेसमेंट एजन्सीद्वारेच ठेवले जातात.

तुम्ही तुमच्या घरातील एका खोलीतून प्लेसमेंट एजन्सी सुरू करू शकता. या सेवेसाठी तुम्ही मोठ्या कंपन्यांशी टाय-अप करू शकता आणि तुमच्या एजन्सीद्वारे बेरोजगारांना रोजगार देऊ शकता.

कोणताही खर्च न करता हा एक चांगला व्यवसाय आहे. आजच्या युगात प्रत्येक लहान-मोठ्या शहरात प्लेसमेंट एजन्सी आहेत. आयटी, फायनान्स, मार्केटिंग, एचआर, अकाउंट्स, लॉ, हेल्थकेअर, सोशल मीडिया या क्षेत्रातील जाणकार लोक स्वतःची कन्सल्टन्सी कंपनी उघडू शकतात.

5. अनुवादक

जर तुम्ही हिंदीतून मराठीत किंवा मराठीतून हिंदीत भाषांतर करण्यात तज्ञ असाल तर तुम्ही घरबसल्या कमाई करू शकता. हे एक उत्तम अर्धवेळ काम आहे. सर्व संस्था अर्धवेळ भाषांतरकार भाड्याने घेतात.

याशिवाय, प्रकाशनात सहभागी होऊन तुम्ही मोठी कमाई करू शकता. हजारो पानांचे पुस्तक एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित केले जाते.

या क्षेत्रात तुम्ही तुमच्यासोबत अनेकांना रोजगार देऊ शकता. याशिवाय आजकाल वेबसाइट डिझायनर आणि डेव्हलपरला विशेष मागणी आहे. अशा लोकांशी संपर्क साधून तुम्ही मोबाईल अॅप आणि वेबसाइट बनवण्याचे काम सुरू करू शकता.

नोंद- इथे फक्त व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पनेबद्दल माहिती दिली आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यासोबतच तुमच्या व्यवसायाच्या विक्रीवर नफ्याचे आकडे अवलंबून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com