

अमेरिकेतील ऑनलाइन गृहकर्ज कंपनी बेटर होम अँड फायनान्सचे संस्थापक आणि माजी सीईओ विशाल गर्ग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये एका झूम कॉलद्वारे सुमारे ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यामुळे जगभरात चर्चेत आलेल्या गर्ग यांना आता स्वतःच सीईओ पदावरून हटवण्यात आले आहे.