
पोस्ट विभाग (DOP) आणि AMFI यांच्यात म्युच्युअल फंड वितरणासाठी सामंजस्य करार झाला.
3 वर्षांसाठी वैध असलेला हा करार देशभरातील शहरी व निम-शहरी भागातील गुंतवणूकदारांना लाभ देणार आहे.
पोस्ट विभागाच्या विश्वासार्ह नेटवर्कमुळे फायनान्शियल इन्क्लूजनला मोठा हातभार लागणार आहे.
Mutual Funds: फायनान्शियल इन्क्लूजन करण्यासाठी पोस्ट विभाग (DOP) आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) यांनी भागीदारी केली आहे. याअंतर्गत पोस्ट ऑफिसमार्फत म्युच्युअल फंड वितरित करण्यासाठी दोन्ही संस्थांनी एकमेकांशी हातमिळवणी केली आहे.