Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार?

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने देशातील जनतेला पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel Pricesesakal

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने देशातील जनतेला पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे. तेल कंपन्यांनी आज जरी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले नसले तरी लवकरच या दोन्हीच्या किंमती कमी होतील असे बोलले जात आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे आणि ती पुन्हा एकदा प्रति बॅरल 75 डॉलर पर्यंत खाली आली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 77 डॉलर वरून 73.81 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल 69.56 डॉलर पर्यंत खाली आली.

अशा परिस्थितीत देशात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ठरवतात. अशा परिस्थितीत एलपीजी सिलेंडरची किंमतही निश्चित केली जाऊ शकते.

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे, तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत 1 लिटरसाठी 106.31 रुपये मोजावे लागतात तर डिझेलला 92.27 रुपये प्रति लिटर मोजावे लागतात. देशातील विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या किंमतींचे कारण म्हणजे राज्य आणि स्थानिक सरकारकडून आकारला जाणारा कर आणि त्याच्या वाहतुकीचा खर्च.

Petrol Diesel Prices
RBI MPC June 2023: कर्जाचा EMI कमी होणार? RBI ने केली मोठी घोषणा

तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता जागतिक तेलाच्या दरानुसार देशातील प्रत्येक लहान-मोठ्या शहरांसाठी तेलाचे दर अपडेट करतात. देशातील विविध तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडियन ऑइलने आपल्या वापरकर्त्यांना पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर फोनवर मिळवण्याची सुविधा दिली आहे.

तुम्ही तुमच्या फोनवरून RSP <space> पेट्रोल पंप डीलरचा कोड टाइप करून 92249 वर एसएमएस पाठवू शकता आणि तुम्हाला तेलाच्या नवीन किंमती कळतील. दिल्लीतील रहिवाशांना ही माहिती मिळवायची असल्यास, ते RSP 102072 वर 92249 92249 टाइप करून एसएमएसद्वारे नवीन दर जाणून घेऊ शकतात.

Petrol Diesel Prices
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com