
सरकार जीएसटीमध्ये मोठे बदल करणार असून फक्त दोन कर दर (5% आणि 18%) ठेवण्याची शक्यता आहे.
या बदलामुळे सुमारे 40,000 कोटी रुपयांचा तात्पुरता महसुली तोटा होईल, मात्र वाढलेला ग्राहक खर्च तो भरून काढेल अशी अपेक्षा आहे.
नवे दर दसऱ्यापासून लागू होऊ शकतात.
GST Slab Rationalisation: केंद्र सरकार वस्तू व सेवा कर (GST) व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या तयारीत असून या बदलांमुळे केंद्र व राज्य सरकारांना मिळून सुमारे 40,000 कोटी रुपयांचा महसुली तोटा सहन करावा लागेल, अशी माहिती वित्त मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.