
केंद्र सरकारने UPS पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मध्ये जाण्याचा पर्याय दिला आहे.
हे स्विच एकदाच करता येणार असून निवृत्तीपूर्व 1 वर्ष किंवा VRS पूर्वी 3 महिने हा निर्णय घ्यावा लागेल.
स्विचनंतर गॅरंटीड पेन्शन बंद होईल, मात्र सरकारकडून NPS खात्यात 4% अतिरिक्त योगदान मिळेल.
Pension Reform: केंद्र सरकारने पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. वित्त मंत्रालयाने जाहीर केले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन सिस्टीम (UPS) मधून नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये जाण्याची एकदाच संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.