
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या RCOM आणि इतर ठिकाणांवर CBI ने छापा टाकला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 13 जून 2025 रोजी अंबानी यांच्या खात्याला “फ्रॉड” घोषित केले होते.
या प्रकरणात SBI ला तब्बल 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा आरोप असून चौकशी सुरू आहे.
2,000 Crore Bank Fraud Case: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्या RCOM कंपनीशी संबंधित ठिकाणांवर CBIने छापे टाकले आहेत. 13 जून 2025 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अंबानी यांच्या खात्याला "फ्रॉड" घोषित केले होते. त्यानंतर 24 जून रोजी ही माहिती रिझर्व्ह बँकेला (RBI) देऊन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अखेर CBI ने औपचारिक गुन्हा दाखल करून चौकशीची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.