BigBloc Construction Limited : 4 वर्षात 4200% दमदार परतावा, लवकरच बोनस शेअर्सवर निर्णय...

Multibagger Stock : स्मॉलकॅप कंपनी बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन (BigBloc Construction) बोनस शेअर्सबाबतीत 19 जुलैच्या बैठकीत निर्णय घेणार आहे. हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.
BigBloc Construction Limited gave high return on investment in 4 years
BigBloc Construction Limited gave high return on investment in 4 yearsSakal

स्मॉलकॅप कंपनी बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन (BigBloc Construction) बोनस शेअर्सबाबतीत 19 जुलैच्या बैठकीत निर्णय घेणार आहे. हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

सध्या कंपनीच्या शेअर्समध्ये 3.35 टक्क्यांनी वाढ झाली असून हा शेअर बीएसईवर 261.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 1853.93 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 284 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 137.55 रुपये आहे.

बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनचे बोर्ड ऑथराइज्ड शेअर कॅपिटल वाढवण्याच्या प्रस्तावावरही विचार करेल. कंपनीचे सध्याचे शेअर कॅपिटल 14.14 कोटी आहे, जे प्रत्येकी 2 रुपयांचे फेस व्हॅल्यू असलेल्या 7.07 कोटी इक्विटी शेअर्समध्ये विभागले गेले आहे. बोनस मंजूर झाल्यास, तो कंपनीच्या राखीव निधीतून दिला जाईल, ज्याची रक्कम 89.87 कोटी आहे.

बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनने आर्थिक वर्ष 24 मध्ये 31 कोटीचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट नोंदवला आहे, तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये हा आकडा 30 कोटी होता. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा महसूल 243.22 कोटी होता, जो आर्थिक वर्ष 2023 मधील 200.11 कोटीच्या तुलनेत वार्षिक आधारावर 21% जास्त आहे. या कालावधीत, कंपनीचा EBITDA 56.15 कोटी होता, जो 12.29% नी वाढला आहे.

बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 12 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 62 टक्के मजबूत परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 73 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी 1175 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना 4200 टक्के बंपर नफा मिळाला आहे.

BigBloc Construction Limited gave high return on investment in 4 years
BlackBuck IPO : 'हा' स्टार्टअप लवकरच आणणार 550 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घेऊ...

जेव्हा एखादी कंपनी बोनस शेअर जारी करते, तेव्हा तिच्या शेअरहोल्डर्सना ते मिळवण्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च सहन करावे लागत नाहीत. तुम्हाला मिळणाऱ्या बोनस शेअर्सची संख्या तुमच्याकडे आधीपासून असलेल्या शेअर्सच्या संख्येवर अवलंबून असते. फर्मने निश्चित केलेल्या रेकॉर्ड डेटपूर्वी शेअर्स असणारे सर्व शेअरहोल्डर्स बोनस शेअर्ससाठी पात्र असतात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com