
Bitcoin All Time High: बिटकॉइननं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला असून, त्याची किंमत 1,13,734.64 डॉलर पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे एका बिटकॉइनची किंमत एक कोटी एक लाख एकोणविस हजार एकशे अठ्ठावन्न रुपये (1,01,19,158 रु) झाली आहे.
या वर्षी बिटकॉइनमध्ये आतापर्यंत 21 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. या प्रचंड तेजीमागे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास, संस्थात्मक खरेदी आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून मिळालेलं पाठबळ ही मोठं कारण मानली जात आहेत.