
BlackRock CEO Larry Fink Warns: जगातील सर्वात मोठ्या असेट मॅनेजमेंट ब्लॅकरॉक इंकचे सीईओ लॅरी फिंक यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर लादलेले टॅरिफ अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरणार आहे. लॅरी फिंक म्हणतात की, ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळे मंदीकडे वाटचाल करणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला आणखी नुकसान होईल.
यामुळे डॉलर कमकुवत होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. न्यू यॉर्क इकॉनॉमिक क्लबमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान फिंक म्हणाले की, टॅरिफचा डॉलरवर थेट परिणाम होईल.