
Ratan Tata Stocks: रतन टाटा यांच्या सावत्र बहिणींना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, रतन टाटा यांचा लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांमधील हिस्सा त्यांच्या दोन्ही फाउंडेशनकडे जाईल. त्यांच्या सावत्र बहिणींना हा हिस्सा मिळणार नाही.
न्यायालयाने अलीकडेच या संदर्भात एक आदेश दिला आणि यामुळे टाटांच्या मृत्युपत्राच्या प्रोबेट (कायदेशीर प्रक्रिये)चा मार्ग मोकळा झाला आहे. ही प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.