Burger King: बर्गर किंगचे मापात पाप? छोटा बर्गर पाहून भडकलेल्या ग्राहकाने थेट दाखल केला खटला

Burger King: न्यायालयाने बर्गर किंगला या प्रकरणी आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे.
Burger King
Burger KingSakal

Burger King: बर्गर किंग ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं सांगत एका ग्राहकाने बर्गर किंगविरोधात मियामी कोर्टात केस दाखल केली आहे. न्यायालयाने बर्गर किंगविरोधात दाखल केलेला खटला फेटाळण्यास नकार दिला आहे. यासोबतच न्यायालयाने बर्गर किंगला या प्रकरणी आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे.

दाखल केलेल्या दाव्यात असे म्हटले आहे की बर्गर किंगने इन-स्टोअर मेनू बोर्डवर मोठा फोटो लावला आहे, जो ग्राहकांना आकर्षित करत आहे. परंतु ऑर्डर दिल्यानंतर, ग्राहकांना स्टोअरमधील मेनू बोर्डवर दाखवलेल्या फोटोपेक्षा लहान बर्गर दिले जात आहे, जी ग्राहकांची फसवणूक आहे.

या प्रकरणात, यूएस जिल्हा न्यायाधीश रॉय ऑल्टमन म्हणाले की बर्गर किंगने आपल्यावरील आरोपांच्या बचावासाठी उत्तर द्यावे. जेणे करून दावा करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध होईल. बर्गर किंगने हे देखील सिद्ध केले पाहिजे की स्टोअरमधील मेनू बोर्डवर प्रदर्शित केलेला फोटो ग्राहकांची दिशाभूल करणारा नाही.

Burger King
Amazon CEO: ...अन्यथा नोकरी गमवावी लागेल, अ‍ॅमेझॉनच्या सीईओचा कर्मचाऱ्यांना इशारा

फिर्यादीने म्हटले आहे की बर्गर किंगच्या इन-स्टोअर मेनू बोर्डवर प्रदर्शित केलेला फोटो बर्गरपेक्षा 35% मोठा दिसत आहे. बर्गर किंगने या आरोपाला उत्तर देताना म्हटले आहे की, हुबेहुब फोटोमध्ये दिसणारे बर्गर ग्राहकांना दिले जावेत, हे गरजेचे नाही.

Burger King
Jio Financial Services: अंबानींनी गुंतवणूकदारांना केले मालामाल! जिओ फायनान्शियलच्या शेअर्समध्ये तुफान तेजी

इतर फास्ट फूड कंपन्यांना अलीकडेच खोट्या जाहिरातींच्या दाव्यांमुळे कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. या वर्षी टॅको बेलवर खोट्या जाहिराती केल्यामुळे अमेरिकेत पिझ्झा आणि रॅप्स विकल्याबद्दल खटला भरण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com