Business Idea : SBI सह कमी पैशांत हा बिजनेस करा, कमीशनसह बक्कळ कमाईही होईल..जाणून घ्या प्रोसेस

कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय मोठा नफा देणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
Business Idea
Business Ideaesakal

Business Idea : सध्या तरुणांचा कल जास्तीत जास्त स्टार्टअप्स आणि व्यवसायाकडे दिसून येतो. अशातच तुम्हीही तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि कमी गुंतवणुकीत तुम्ही घरी बसून मोठी कमाई करण्याचा विचार करत असाल तर देशातील सर्वात मोठी बँक SBI तुम्हाला यामध्ये मदत करू शकते.

यासाठी तुम्ही एटीएम फ्रँचायझी घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सामील होऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला मोठी रक्कमही गुंतवावी लागणार नाही. म्हणजेच कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय मोठा नफा देणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

या कंपन्या बँकांचे एटीएम बसवतात

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची एटीएमची फ्रँचायझी घेण्यासाठी, तुम्हाला एटीएम इंस्टॉलेशन कंपन्यांशी संपर्क साधावा लागेल. सर्व बँका त्यांचे एटीएम बसवण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांशी करार करतात. यामध्ये टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम, इंडिया वन एटीएम या कंपन्यांचा समावेश आहे. SBI बद्दल सांगायचे तर, सर्वात मोठी सरकारी बँक टाटा इंडिकॅशला बहुतेक काँट्र्रॅक्ट फक्त त्याचे एटीएम स्थापित करण्यासाठी देते, अशा परिस्थितीत, तुम्हाला एसबीआय एटीएम फ्रँचायझी काढण्यासाठी या कंपनीकडे अर्ज करावा लागेल.

Business Idea
Business Idea

फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी योग्य पद्धत

डिजिटलीकरणाच्या युगात ज्या कंपन्यांनी एटीएम बसवले आहेत त्यांच्याकडे फ्रँचायझीसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही खूप सोपी झाली आहे. ज्या कंपन्या या सेवा देत आहेत, त्यांच्या वेबसाइटवर अर्ज करण्याचा पर्याय आहे. यासह, तुम्हाला एटीएम फ्रँचायझीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती देखील मिळते. SBI ATM च्या फ्रँचायझीसाठी तुम्हाला www.indicash.co.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

होमपेज ओपन होताच तुम्हाला येथे ATM Franchise चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला न्यू पेजवर सगळ्या डिटेल्स मिळतील. येथे तुम्हाला एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी एक फॉर्म मिळेल, जो तुम्हाला भरून सबमिट करावा लागेल.

किती पैशांची गुंतवणूक करावी लागेल?

एटीएम फ्रँचायझी मिळविण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. Tata Indicash कंपनीची गुंतवणुकीची एकूण किंमत 5 लाख रुपये आहे. इंडिकॅश एटीएम फ्रँचायझी देण्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 2 लाख रुपये ठेवते, जे रिफंडेबल आहेत. याशिवाय अर्जदाराला ३ लाख रुपये वर्किंग कॅपिटलच्या रुपात द्यावे लागतील. एवढीच गुंतवणूक करून तुम्ही घरी बसून दर महिन्याला चांगली कमाई करू शकता.

Business Idea
Business Success Story : दुकान साफ करण्यापासून सर्वकाही केलं आणि आज जपानमधला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला!

फ्रँचायझी मिळवण्यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतात

एटीएम फ्रँचायझी मिळवण्यासाठी काही आवश्यक अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. या अंतर्गत, जर तुम्ही एटीएमसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याजवळ सुमारे 80 चौरस फूट जागा असावी, जी लोकांच्या ये-जा असलेल्या भागात असावी आणि त्यांच्या आजूबाजूला किंवा 100 मीटरच्या अंतरावर इतर कंपन्यांचे एटीएम असावेत.

तुम्ही ज्या ठिकाणी एटीएम बसवण्याचा विचार करत आहात तेथे २४X७ वीज पुरवठा असणे देखील आवश्यक आहे. इतर अटींबद्दल सांगायचे तर, व्ही-सॅट बसवण्यासाठी एक किलोवॅट वीज कनेक्शन आणि सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून एनओसी आवश्यक आहे.

फ्रँचायझीसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत

आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र

पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशन कार्ड किंवा वीज बिल बँक खाते आणि पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो, ई-मेल आयडी, व्हॅलिड फोन नंबर

तसेच तुमच्याकडे GST क्रमांक असणे आवश्यक आहे

Business Idea
SBI Scheme : एसबीआयची ही योजना पुन्हा सुरू; ७.६ टक्के मिळणार व्याज

दरमहिन्याला 50,000 रुपये कमवा!

आता SBI मध्ये तुमचा बिझनेस सुरु केल्यानंतर तुम्हाला किती कमाई होईल याबाबत जाणून घेऊया. प्रत्यक्षात SBI प्रत्येक रोख व्यवहारावर एटीएमच्या फ्रँचायझीला 8 रुपये देते. त्याच वेळी, एटीएममधून प्रत्येक नॉन-कॅश व्यवहारावर बँकेकडून 2 रुपये दिले जातात. (Business)

Business Idea
Business Tips In Marathi : नव्या व्यवसायात उडी घेण्यापूर्वी या भानगडी सोडवा; नाहीतर पुरते अडकाल?

जर एखाद्या कार्डधारकाने तुमच्या एटीएममधून पैसे काढले, तर तुम्हाला त्याबदल्यात पैसे मिळतील. ग्राहकाचा व्यवहारही होईल आणि तुम्हाला प्रत्येक चौकशीसाठी 2 रुपये मिळतील.

अशाप्रकारे, जर तुमच्या जागेवर बसवलेल्या एटीएम मशिनपर्यंत एका दिवसात सुमारे 300 लोक पोहोचले आणि त्यापैकी 200 लोकांनी पैसे काढले आणि 100 लोकांनी फक्त शिल्लक तपासली, तर तुम्हाला एका महिन्यात सुमारे 50,000 रुपये मिळतील. एटीएम व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढल्याने तुमची कमाईही वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com